अविस्मरणीय केरळ ट्रीप
केरळसाठी पुण्याहून घरातून नाश्ता करून निघालो. 11.25 चं कोचीचं फ्लाईट होतं. प्रवास सुरू झाल्यावर अर्ध्या तासात लंच टाईम. अर्थात नेहमी प्रमाणे मेनू आणि त्याच्या किंमती पाहून, आम्ही आमच्या बरोबर नेलेला खाऊचा डब्बा उघडण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात आमच्यासाठी लंच कॉम्प्लिमेंटरी आहे असं एका हवाई मुलीनं जवळ येऊन सांगितलं....
आणि आपण आज * ओअॅसिस * मधून ट्रिपसाठी चाललोय, म्हणून या विशेष सुविधा.. याची प्रकर्षाने जाणीव झाली. मग समोर आलेल्या गरम गरम.. राईस, राजमा आणि मेथी पनीर वर आम्ही ताव मारला... आणि पोटही शांत झालं...It was really great arrangement by OASES.. And it was unexpected... Thanks a lot..
आणि पहिला सुखाचा मार्ग पोटाच्या शांततेतून सुरू झाला.
मग एअर पोर्ट वरचा पिक अप आणि स्वागत अगदी घरातली माणसांनी करावं तसं.. मग एका स्वच्छ सुंदर आणि आपलंसं वाटणाऱ्या हॉटेल मधे विश्रांती.. आणि लंच. अप्पमसारखे खास पदार्थ खाऊन बस्.. दिल खुश हुआ..!
सायंकाळी कोचीत फेरफटका.. चर्च, डच पॅलेसमधलं केरला गव्हर्न्मेंटच्या वेळेत चालणारं म्युझियम, त्याच्या आसपासचं मार्केट, चायनीज फिशिंग नेट...मग विश्रांती आणि डिनर..
पुर्ण ट्रीपमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर फ्री आणि उत्तम होतं.. विनम्र सर्व्हिस.तिथला प्रत्येक माणूस हा आपला वाटत होता.
दुसरे दिवशी सकाळी मुन्नरला निघालो.. बिवीन नावाच्या गाईड कम ड्रायव्हरने आमची पुर्ण जबाबदारी घेतली होती. Very positive, cool and decent person who accompanied the whole trip very smartly. त्याने वाटेतील प्रत्येक गोष्ट अतिशय हुषारीने मॅनेज केली. कुठच्याही प्रकारची हाव नाही, व्यसन नाही. पुढे पुढे करणं नाही. अत्यंत वक्तशीर,स्वच्छ, सोज्वळ. चार दिवसात त्याने आम्हाला आपलंसं केलं. परत परत राहून राहून वाटतंय की बिवीन खेरीज ही ट्रीप कशी झाली असती? ओअॅसिस च्या कनेक्शन मधली माणसं जर अशीच असतील तर.. "हे विश्वची माझे घर" असा अनुभव प्रत्येकाला येईलच. यात शंकाच नाही.
प्रत्येक ठिकाणचं हॉटेल अप्रतिम आणि शांततेचा अनुभव देणारं , सर्व्हिस अत्यंत आपुलकीची, खाणं चविष्ट आणि भरपेट..
बिविनने प्रत्येक घरगुती, ताज्या गोष्टी आम्हाला मिळवून दिल्या. उदा. खाण्यासाठीचं खोबरेल तेल, केळ्याचे वेफर्स, आडवं कळीचं पान मांडून वाढलेली केरला थाळी.,इत्यादी..
मुन्नारच्या वाटेतले सुंदर धबधबे, केरला आयुर्वेदिक परफेक्ट मसाज, नॅशनल पार्क खूपच एन्जॉय केलं.
ठेकडी च्या वाटेवर मसाल्याच्या पदार्थांची बाग, माहिती आणि खरेदी खूपच माहितीपूर्ण होती. ठेकडीत संध्याकाळी हत्ती सफारी, मार्शल आर्ट शो, कथकली शो सगळं समाधान देणारं होतं. ठेकडीत पहाटे केलेली जंगल सफारी. अमाप गवतीचहाचं धुक्यातलं दर्शन एक्साईट करणारं होतं.
कुमारकोमच्या वाटेवर चहाची ट्रॅडीशनल फॅक्टरी पाहून अनेक बारकावे कळण्यास मदत झाली.तिथली संध्याकाळची बॅकवॉटर मधली, दोन तासांची शिकारा राईड खूप काही सांगून गेली.. शिकाऱ्यातून उतरूनही मन तिथेच नाव हाकीत राहिलं होतं..
कुमारकोमला सकाळची बर्ड सॅन्क्चुरी व्हीजिट, फारसे पक्षी नसले तरी फ्रेश करणारी होती. (जान. फेब. मधे तिथे बरेच पक्षी स्थलांतरित होतात असं गेटवर सांगण्यात आलं). वाटेत बिवीनने केरला साडी, लुंगी आणि कपडा विणणाऱ्या दुकानाजवळ गाडी थांबवली. तिथे पाच सहा विणकर हातमागावर विणत बसले होते. भारी वाटलं... त्यांचे कष्ट आणि कौशल्य पाहून खरंच खरेदी करावीशी वाटली.
नंतरचा एल्लप्पीत हाऊस बोटमधला मुक्काम होता. थोडसं सेट झाल्यावर बोट फिरण्यासाठी बाहेर काढली. तिथेच जेवण, संध्याकाळी चहा नाश्ता. मग गावाच्या किनाऱ्यावर बोटीचं पार्किंग. चार तासांच्या फेरफटक्याने मिळालेली मनःशांती अतुलनीय होती. काहीशी उल्हसित करणारी तर काहींना भीती निर्माण करणारी बोटीमधली रात्र...सकाळी इडली सांबारचा आस्वाद घेताना, पुन्हा तासाभराचा राऊंड... फारच सुंदर अनुभव. मग कोची एअरपोर्ट साठी रवाना..
वाटेत लूलू मॉल, साऊथ एशियातला सर्वात मोठ्ठ्या मॉलला व्हिजिट. स्पेशल केरला फ्रेश गरम गरम वेफर्सची खरेदी.
फायनली एअरपोर्ट आणि बिवीन बरोबरचं फोटो सेशन. बिविनने तिथल्या मॅनेजरच्या ताब्यात आम्हाला दिलं. आणि हसतमुख चेहऱ्याने आमचा निरोप घेतला. मग चेक इन... परत एकदा फ्लाईट मधला, ओअॅसिस तर्फे स्पेशल इव्हिनिंग स्नॅक्स... आणि पुण्यात परत...
खरंतर ही ट्रीप संपू नये असंच वाटत होतं..!
Thanks a lot Amit Pethe and OASES for U team...
स्मिता, सुबोध, शील